Tuesday, January 17, 2012

Mumbai Airport


अखेर अनिश्चिततेची वेळ संपली आणि परवा माझे तिकीट आले.मी सिंगापूर ला जाणार हे निश्चित झाले.ऑफिस कडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि माझा जीव भांड्यात पडला. 
खरं तर जेव्हा मंगलवारी  समजले की मला ट्रिप postpone करावी लागणार तेव्हा फार फार वाईट वाटले.माझे आपले नेहेमीच असे होते.तोंडात जाणारा घास तोंडात जाताच नाही.असे कितीतरी प्रसंग माझ्या स्मरणात आहेत.पण ह्यावेळेस वेगळेच घडणार होते आणि तसेच घडले म्हणुनच मी आज मुंबई एअरपोर्ट वर बसून हे सगळं लिहित आहे.असो.
गुरुवारी संध्याकाळी माझ्या manager कडून confirmation आले आणि सगळी धावपळ सुरु झाली. दिवस ऑफिस मध्ये एक मिनिटाचिही उसंत मिळाली नाही.शुक्रवारी मला forex collect करायचे होते.ते मला संध्याकाळी .३० वाजता मिळाले.हातात पडलेले पहिलेच दुसरया देशातील पैसे.सॉरी सॉरी SGD म्हणजे सिंगापूर डोंलर्स.आजपर्यंत अनेक लोकांना USD, GBP मध्ये बोललेले ऐकले होते आणि जवळ्पास प्रत्येक वेळेसच माझे मन खट्टू होत होते की मला अजुन onsite चा experience मिळाला नाही. पण माझ्या हातात SGD आलेले पाहून मला फार आनंद झाला.आता मी निदान SGD ..SGD तरी बोलू शकते. आज नाही तर उदया USD , GBP पण बोलेन.
मला ३०० SGD च्या नोट मिळाल्या होत्या.१००$ ची एक नोट अशा नोटा.लगेच मी ३००$ * २६ = ७८०० Rs करुन पाहिले.सगळेच जण असच करत असतील का? मला forex card मध्ये ३४००$ दिले होते.ते कसे वापरायचे हे मी सिंगापूर ला जाउनच ठरवायचे असे मनाशी ठरवले.



शनिवारी रात्रि १२.०५ मिनिटानी म्हणजे 3 Aug २००८ early morning अशी माझी flight होती.flight अर्थातच मुंबई हून होती. तास buffer मध्ये असावा म्हणून मी आणि दादा दुपारी वाजताच पुण्याहून निघालो.आता मात्र मला जाम टेंशन आले होते.ह्या सगळ्या प्रोसेस मधून मी व्यवस्थित जाईल ना.जशी जशी गाड़ी मुंबई कड़े सरकत होती तसे तसे मला वाटायला लागले की मला कस्टम्स, Immegration आणि आणखीन सगळे एअरपोर्ट वरचे लोक सिंगापूर ला जाऊ देतील ना.



अखेर आम्ही मुंबई सहारा एअरपोर्ट ला पोहोचलो. छत्रपति शिवाजी टर्मिनस इंटरनेशनल एअरपोर्ट. लांबून दिसणारे निळया बोर्ड वरचे ठळक नाव. टर्मिनल कड़े जाताना मला किती आनंद आणि टेंशन होतं हे मी शब्दात सांगूच शकत नाहीये.एअरपोर्ट मला काही नवीन नाही तरीही मला बावचळल्यासारखे झाले. आत्ता मला माझेच हसू येत आहे पण .३० वाजता खरच घाबरले होते. आत आल्यावर दादाला फ़ोन करून जायला सांगितले त्यामुळे आता मला फारच एकटे वाटायला लागले होते . मग जरा धीर करून एका एअरपोर्ट वरच्या माणसाला विचारले
एयर इंडिया सिंगापूर flight चे चेक इन कुठे होते?”
तो म्हणाला
अजून सुरु झाले नाही
आत्ता वाजत आले होते. मी तिथेच ट्रोंली घेउन उभी राहिले.तेवढ्यात  एक बाई माझ्याजवळ आली. थोड़े इकडे तिकडे पाहिल्यावर तिने मला हिंदीत विचारले
सिंगापुर जाने वाली flight  का चेक इन कहा होगा?”
मुझे नही पतामाझे उत्तर
त्या  एका  प्रश्नाने माझ्या जीवात  जीव आला . मी लगेच  तिला विचारलं.
आप एयर इंडिया सिंगापुर flight   के लिए खड़े हो?”
हंतिचे उत्तर
आता  सगळंच सोप्पं झालं होतं .ह्या बाई च्या मागे गेलं म्हणजे मी सिंगापुर ला जाणार हे निश्चित. ती  एका  ठिकाणी जाऊन बसली. स्वतः एकदा विचारावे म्हणून एका काउंटर वरच्या बाई ला विचारायला गेले तर माझ्या आधी एक मुलगा तिला नेमके हेच विचारत होता. चला अजुन एक एयर इंडिया सिंगापुर मेंबर मिळाला .
त्याने मला विचारले
तुम्ही पहिल्यांदाच आउट ऑफ़ इंडिया जाणार आहत का?”
हो, तुम्ही?”
मी पण
मी लगेच त्याला सगळी process विचारून घेतली. मग मी निश्चिंतपणे ती बाई आणि हा मुलगा ह्यांच्या हालचालीकडे पाहत बसले. दोघं साधारण  .३० ला काउंटर २४ च्या लाइन मध्ये गेले. मी लगेच त्यांच्या मागे हजर. काउंटर वरचा माणूस मराठीच होता. माझ्या bag  चे  वजन बरोबर २० kg  भरले. घरातुनाच वजन करून आणले होते. मी त्याला विचारले
किती kg  allowed   असतात?”
तो म्हणाला
३० kg  ”
म्हणजे मी येताना १० kg  चे  काहीतरी भरून आणू शकत होते.
त्याने माझे वर्क परमिट पाहिले अणि मला बोर्डिंग पास दिला. एक immegration चा फॉर्म दिला. तिथेच पुढे immegration च्या बोर्ड खाली बरीच टेबलं ठेवली होती. तिथे उभी राहून मी फॉर्म भरू लागले. तेवढ्यात एक ट्रोली वाला आला आणि माझी हैंडबैग माझ्या हातात देऊन ट्रोली च घेउन जायला लागला. मी म्हटलं
“ट्रोली का घेउन जात आहात ?”
तो चिरक्या स्वरात बोलला
“ट्रोली allowed  नाहीये इथे
झालं आता हे किलो चं ओझं मला स्वतःलाच उचलावं लागणार. मी ती बैग माझ्या दोन्ही पायांमध्ये जमिनीवर ठेवली आणि फॉर्म भरु लागले. मी किती घाबरट आहे ना!ती बैग मी बाजूला ठेवली असती तरी चाललं असतं पण नाही..मी ती बैग दोन्ही पायांमध्येच ठेवली जणू तिथून ती कोणी उचलणार नाही.

माझा फॉर्म भरतच आला होता तेवढ्यात एक एअरपोर्ट वरचा माणूस एका मुस्लिम बाई ला घेउन माझ्याजवळ आला.
“madam  , इनका जरा फॉर्म भरदो ना !.muscat   का है इसलिए मुझे समझ मी नही अराहा ”
मी म्हणालेदेते भरून
ती बाई काळा बुरखा घालून आली होती. मी तिला विचारून फॉर्म भरू लागले
“Nationality   कोणती ?”
तिचे उत्तर “Muscat ”
मी फॉर्म वर भरले Muscat
“Where do you want to go ”
“Muscat”
“Passport  Issued  at ?”
“Muscat”
मग मात्र मला doubt  आला. हिला Muscat शिवाय दुसरं काही येतं की नाही ?
“Date of birth?”
मी expect  करत होते “Muscat”. पण ह्यावेळेस ती हिंदीत बोलली. “इंग्लिश नही आता ”
मग मी सगळं काही हिंदीत विचारून घेतलं आणि तिचा फॉर्म भरून दिला. नंतर मी immegration च्या लाइन मध्ये जाऊन उभी राहिले. विप्रो च्या Overseas  Desk ने मला इतके घाबरवून सोडले होते की बस!. मी माझ्या पुढच्या माणसाला विचारलं
“is this line for Flight  Boarding?”
“Yes” त्याचे तुटक उत्तर
मी पुन्हा विचारले
“Where  do  you  need  to  declare  valuables ?”
“You  dont  need  to " तो
“But  gold ,camera ,mobile  we  need  to  declare  right?”
Not  required  ..even  i  am  carying  that 
असं बोलत बोलत आम्ही एका काउंटर पाशी पोहोचलो. मी त्याला विचारलं
“Are  You  travelling  for  the business  purpose?”
“Yes,You?” - तो
“Me ,too” मी
“Which  Company?” तो
“Wipro” मी
“Same  here” तो
हा हा हा. तो पण विप्रोचाच निघाला.
त्याने विचारले
“Which  location?”
“Pune,What  about  you?” मी
“Bangalore” तो
जाऊदे बंगलोर चा का असेना Wiproit निघाला हे महत्वाचा.तो Switzerland ला जाणार होता.आता माझे Immegration  clear  व्हायला काहीच अडचण नव्हती. मी सगळे प्रश्न त्यालाच विचारून घेतले.
तो म्हणाला “They  are  the  last  person  to  trust "
मी हसले. किती घबरवतात हे लोक आणि प्रत्यक्षत काहीच भितीदायक होत नाही.काउंटर वरच्या माणसाने मला वर्क परमिट related बरेच प्रश्न विचारले आणि एकदाचे iImmegration clear केले.माझ्या पासपोर्ट वर २ August २००८ ला पहिला शिक्का बसला.
मी कस्टम मधून through झाले आणि आत आले. मला काउंटर २४ वर भेटलेला मुलगा परत तिथे भेटला. तो म्हणाला Flight  Boarding ११.२० ला आहे तोपर्यंत आराम.खाली गेट number आहे. मी म्हंटले “thank  you”


इतक्या वेळानंतर मला थोडंसं डोकं ठणकत असल्याचं जाणवलं. चेहरा धुण्याची प्रबल इच्छा झाली. मी wash  room पाहिले आणि आत गेले.बेसिन मध्ये पाणी सोडले आणि पाण्याचे शिपाकारे मारायला सुरुवात केली. थंड थंड पाणी चेहेर्याला लागले आणि मला एकदम हुशारी वाटायला लागली. मी पाणी मारताच गेले .जवळपास मिनिटे मी चेहेर्यावर ते गार गूट्टुक पाणी मारत होते. सध्या थंड पाण्याने पण किती बरे वाटते. मी एकदम फ्रेश झाले.बाहेर एक कोपर्यातली जागा पाहिली आणि लिहित बसले.